विनायक पवार याने शनिवारी घराशेजारील पाण्याच्या टाकीजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पतीच्या आत्महत्येनंतर बायकोनेही सोमवारी तिथेच जाऊन गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांना दोन छोटी मुलं होती. आई वडिलांच्या आत्महत्येनंतर चिमुरडे पोरकी झाली आहेत.
सोलापुरातील नवरा-बायकोच्या आत्महत्येचे कारण काय?
विनायक पवार हा रंगारी (पेंटर) होता. सोलापूर शहरात आणि ग्रामीण भागात तो छोटी मोठी रंगारी कामे करायचा. परंतु त्याची बायको त्याच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायची. यातून त्यांची सारखी भांडणे होत होती. आपली बाजू पटवून देण्याचा विनायक नेहमी प्रयत्न करायचा. परंतु पूजादेवीला त्याची बाजू मान्य होत नसे.
advertisement
अखेर दररोजच्या भांडणाला कंटाळून विनायकने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या करताना त्याने व्हॉट्सअॅपवर मुलांची माफी मागणारे स्टेटस ठेवले. माऊ आणि माऊ मला माफ करा, अशी भावनिक आर्त साद घालून विनायकने जगाचा निरोप घेतला.
ज्या ठिकाणी नवऱ्याने प्राण सोडले, त्याच ठिकाणी गळफास घेऊन बायकोचीही आत्महत्या
विनायकने शनिवारी जीवन संपविल्यानंतर अनेकांनी पूजादेवीला यासाठी जबाबदार धरले. त्यामुळे पूजादेवीही प्रचंड तणावात होती. तिनेही सोमवारी रात्री उशिरा विनायकने ज्या ठिकाणी आत्महत्या केली, त्याच ठिकाणी जाऊन ओढणीने गळफास लावून घेतला.
हर्ष आणि माऊ पोरकी झाली, नातेवाईक हुंदक्यांनी दाटले, चिमुकल्यांच्या प्रश्नाचे उत्तर कुणाकडे नाही
आई वडिलांच्या आत्महत्येने चिमुरडी क्षणांत पोरकी झाली आहेत. हर्ष आणि माऊ अशी त्यांचे नावे आहेत. आई बाबा कुठे गेले, हा प्रश्न सारखे ते नातेवाईकांना विचारत आहेत. पण नातेवाईंकडे या प्रश्नाचे काहीही उत्तर नाही. या प्रसंगाने सोलापूरकर गहिवरून गेले आहेत.