सोलापूर - शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येतो. या माध्यमातून अनेक जण चांगली कमाई करत आहेत. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी 4 शेळ्यांवर शेळी पालन सुरू केले होते. आज ते शेळीपालनाच्या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
advertisement
तानाजी नागटिळक असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील रहिवासी आहेत. त्यांनी अवघ्या 4 देशी शेळ्यांवर बंदिस्त शेळीपालन सुरू केले. त्यानंतर त्यांनी शेळ्यांचे ब्रिडींग करून बिटल आणि तोतापुरीच्या माध्यमातून 4 लाख रुपयांची कमाई करत आहे.
सुरुवातीला तानाजी यांनी 4 देशी शेळ्यांवर बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. काही दिवसानंतर त्यांनी बिटल जातीची शेळी आणली. तिला ब्रेडिंग केले. त्यापासून जन्माला आलेल्या पिल्लांना भाव देखील चांगला मिळाला. शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. ज्यांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाय, म्हैस या पेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते.
एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये 10 शेळ्या जगू शकतात. आज तानाजी नागटिळक यांच्याकडे 25 ते 30 शेळ्या आहे. यामध्ये तोतापुरी आणि बीटल या दोन जातीच्या शेळ्या आहेत. शेडमध्ये दिवसातून 2 वेळा साफसफाई होते. त्याचप्रमाणे शेळ्यांना अस्वच्छतेमुळे कोणतेही आजाराची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते.
बंदिस्त शेळींना सुखा चारा, ओला चारा, खुराक अशा प्रकारचा आहार दिला जातो. वजनापेक्षा वयाला जास्त किंमत देतो. 3 महिन्यानंतरच शेळीच्या पिल्लांना विकल जाते, असे तानाजी नागटिळक म्हणाले. या बंदिस्त शेळीपालनातून विक्री केलेल्या शेळ्यांच्या माध्यमातून ते वर्षाला 4 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळवत आहे. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.