ही दुर्दैवी घटना बुधवारी (३ सप्टेंबर) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. एका अनोळखी व्यक्तीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. हे पाहून संतप्त झालेल्या जमावाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी त्याला मारहाणही केली.
या गोंधळात तो व्यक्ती पुतळ्याच्या चबुतऱ्यावरून खाली उतरत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस हेड कॉन्स्टेबल खाटमोडे यांनी जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
advertisement
या घटनेनंतर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर, मारहाण आणि मृत्यूच्या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.