राजकारणात चर्चेचा विषय
या नगरपरिषदेच्या एकूण 20 जागांपैकी 9 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. महायुतीमध्ये एकत्र असूनही स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना आमनेसामने ठाकले होते. भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मारलेली ही मुसंडी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. सिद्धी वस्त्रे यांच्या रूपाने एका तरुण चेहऱ्याला संधी देऊन मतदारांना आकर्षित करण्यात शिवसेनेला यश आले आहे.
advertisement
30 वर्षानंतर वस्त्रे परिवार निवडणुकीच्या रिंगणात
मोहोळमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती केली होती. सिद्धी वस्त्रेसह मोहोळमधील उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती. सिद्धी वस्त्रे यांच्यावर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली होती. तब्बल 30 वर्षानंतर वस्त्रे परिवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. या पूर्वीचा विश्वास कायम ठेवत पुन्हा परिवाराला मतदारांनी संधी दिली होती. शहरातील रस्ते, रुग्णालय, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं सिद्धी वस्त्रेने सांगितलं.
मोहोळ भाजपचा वजीर पाडला
दरम्यान, मोहळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी रमेश बारसकर आणि उमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सिद्धी वस्त्रे यांनी सांगितले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांनीही कडवी झुंज दिली. मात्र अखेर 22 वर्षाच्या पोरीने मोहोळ भाजपचा वजीर पाडला, अशी चर्चा होताना दिसतीये.
