सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी हे एक आंदोलक होते. ते वकिलीचे शिक्षण घेत होते. परभणीत ज्यावेळेस जाळपोळ झाली. या जाळपोळीच्या व्हिडिओत ते दिसत होते, म्हणून त्यांना अटक केल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशीवर थर्डडिग्री वापरल्याचाही आरोप होतोय. यावर फडणवीस म्हणाले की, आम्ही त्यांना विचारले तुम्हाला थर्ड डिग्री झाली का? तर त्यांनी सांगितलं कुठलीही मारहाण मला झालेली नाही. सुर्यवंशी पोलिस स्टेशनमध्ये असतानाचे अनइडीटेड व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि या व्हिडिओ फुटेजमध्ये त्यांना कुठेही मारहाण केल्याचे दिसत नसल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
advertisement
दरम्यान फडणवील यांनी यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांचा मेडीकल रिपोर्टही सांगितला. ज्यामध्ये
सूर्यवंशी यांना श्वसनाचा आजार असल्याचे सांगण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या शरीरावर जुन्या जखमा असल्याचीही माहिती आहे. तसेच पोलीस कस्टडीतून ज्यावेळेस ते जेलमध्ये गेले त्यावेळेस सकाळच्या वेळी त्यांना जळजळतय म्हणून एका कैदीने तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले होते, असे फडणवीसांनी सांगितले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, या घटनेने अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. त्यामुळे या शंकाचे निरसन करण्यासाठी न्यायालयीन चौकशी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच त्याच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत दिली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
