TRENDING:

'लालपरी'चा निरोप घेताना बसला घट्ट मिठी; 28 वर्षांच्या सेवेचा अखेरचा दिवस अन् कंडक्टरचा काळजाला भिडणारा VIDEO

Last Updated:

एखाद्या एसटी कर्मचाऱ्याचं आपल्या गाडीशी आणि सेवेशी किती घट्ट नातं असू शकतं, याचं हृदयस्पर्शी दर्शन एका व्हायरल व्हिडिओतून घडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : आजकाल मोठ्या शहरांमध्ये एसी बस आणि मेट्रोसारख्या वाहतुकीच्या सेवा उपलब्ध झाल्या असल्या, तरी एसटी आणि सामान्य प्रवासी यांचं एक वेगळंच नातं आहे. मात्र, एखाद्या एसटी कर्मचाऱ्याचं आपल्या गाडीशी आणि सेवेशी किती घट्ट नातं असू शकतं, याचं हृदयस्पर्शी दर्शन एका व्हायरल व्हिडिओतून घडलं आहे. सोलापूर विभागातील मोहोळ आगाराचे एक वाहक (कंडक्टर) आपल्या २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या फेरीचा भावूक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
एसटी कंडक्टरचा Video पाहून नेटकरीही भावुक
एसटी कंडक्टरचा Video पाहून नेटकरीही भावुक
advertisement

शेवटचा प्रवास आणि बसला मारलेली मिठी

व्हिडिओमध्ये दिसतं की, हे वाहक आपल्या निवृत्तीच्या दिवशी शेवटच्या ड्युटीवर जाण्यापूर्वी बसला (ST Bus) श्रद्धेनं स्पर्श करत आहेत आणि तिला प्रेमानं मिठी मारत आहेत. ज्या बसमध्ये त्यांनी आयुष्यातील २८ वर्षे प्रवाशांची सेवा केली, त्या गाडीचा निरोप घेताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी बसमधील प्रवाशांशी नेहमीप्रमाणे नम्रपणे संवाद साधला आणि तिकिटेही काढली, मात्र हा त्यांचा शेवटचा प्रवास असल्याचे कळताच प्रवासीही हळहळले.

advertisement

नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

"२८ वर्षांच्या प्रवासाची आज शेवटची फेरी... Happy Retirement Papa!" या कॅप्शनसह त्यांच्या मुलाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बसच्या बेलचा आवाज आणि त्या वाहकाचा गणवेशातील वावर पाहून अनेक युजर्सने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. "एसटी कर्मचारी हे खरंच अहोरात्र कष्ट करतात, त्यांच्यामुळेच ग्रामीण भागातील प्रवास सुकर होतो," अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. हा व्हिडिओ 66 हजाराहून अधिकांनी लाईक केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

आज अनेक खासगी वाहने असली, तरी एसटीचा प्रवास आणि या कर्मचाऱ्यांची निष्ठा ही आजही वाखाणण्याजोगी आहे. या निवृत्त वाहकाच्या आयुष्यातील पुढील प्रवास सुखाचा आणि आरोग्याचा जावो, अशा शुभेच्छा नेटकरी देत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'लालपरी'चा निरोप घेताना बसला घट्ट मिठी; 28 वर्षांच्या सेवेचा अखेरचा दिवस अन् कंडक्टरचा काळजाला भिडणारा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल