योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ''महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण महामंडळ'' स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून विविध योजना थेट लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्यात येतील. यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांचे जीवनमान सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे.या योजनेतून महिलांना आर्थिक तसेच सामाजिक सुरक्षा मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल.
धुणीभांडी करणाऱ्या महिलांना मोठे फायदे
advertisement
धुणीभांडी करणाऱ्या महिलांना आता अनेक प्रकारचे लाभ मिळणार आहेत. यामध्ये प्रसूतीसाठी मदत, अंत्यविधीसाठी आर्थिक सहाय्य, अपघातामुळे मदत, तसेच वैद्यकीय मदतीसाठी तरतूद यांचा समावेश आहे.याशिवाय 10 हजार रुपयांपर्यंत थेट आर्थिक लाभही मिळणार आहे. या योजनेअंतर्गत, 60 वर्षांपर्यंत अशा घरकामगार महिलांना विविध शासकीय सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे, जे त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवेल.
नोंदणी प्रक्रिया
योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी वय 18 ते 60 वर्षे असावे आणि मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस धुणीभांडी किंवा इतर घरगुती काम केलेले असावे. इच्छुक महिलांना ऑनलाइन अर्ज भरता येईल. अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये जन्मतारीख पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत आणि 90 दिवस काम केले असल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेमुळे घरकाम करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत, सामाजिक सुरक्षा आणि जीवनमान सुधारण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे भवितव्य अधिक सुरक्षित होईल.