दरम्यान, शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा अचानक रद्द केला आहे. ते सध्या मुंबईत असून दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाणार होते. मात्र त्यांनी हा दौरा अचानक रद्द केला आहे. आता ते पुण्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत. त्यांचा आजचा मुक्काम पुण्यात राहणार आहे. त्यानंतर ते पुन्हा बारामतीला जाणार आहेत. बारामतीत ते पुढचे दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
शरद पवारांनी असं अचानक दौरा का रद्द केला? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्तीची चर्चा सुरू असताना असं अचानक पवारांनी दिल्ली दौरा रद्द केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून सुनेत्रा पवार यांनाच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवावं अशी मागणी समोर येत आहे. यासाठी अजित पवार गटाच्या आमदारांनी सही करून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पत्र दिलं आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादीचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? हे नाव मात्र गुलदस्त्यात आहे.
