TRENDING:

डोक्यावर दु:खाचा डोंगर असताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली? सुनेत्रा पवारांनी सगळंच सांगितलं, पहिल्यांदाच मनातलं बोलल्या

Last Updated:

सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच अजित पवारांच्या अपघातावर भाष्य केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : अजित पवारांच्या अकाली निधनाचा संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. यातून आता पवार कुटुंबासह महाराष्ट्र हळूहळू सावरत आहे. अजित दादांच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अवघ्या ७२ तासांत अशाप्रकारे शपथविधी झाल्याने सुनेत्रा पवारांवर काहींनी टीका केली. शपथविधी घ्यायला इतकी घाई का केली? किमान १३ दिवस थांबायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया जनतेतून समोर आली. तर काहींनी सुनेत्रा पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलं. दरम्यान आज पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांनी यावर भाष्य केले आहे. सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
News18
News18
advertisement

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर स्वत:ला सावरत आहे. डीपीडीसीच्या बैठका आणि बारामतीतला जनता दरबार...सुनेत्राताईंनीही दादांसारखा कामाचा धडाका सुरू केला आहे . आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर भाषण देखील केले आहे. पहिल्यांदाच त्यांनी भाषण केले यावेळी त्या भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. सुनेत्रा पवार यांचे पहिले भाषण केले असून ते व्हायरल झाले आहे. या कार्यक्रमाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

advertisement

दादांसाठी मी सगळं बाजूला ठेवून... सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

सुनेत्रा पवार म्हणाल्या, दादांचं कामावर असलेलं निस्सीम प्रेम आणि चिकाटीच आपल्यासाठी प्रेरणास्थान असल्याचं सांगत त्या पुढे म्हणाले, दादांना काम आणि काम हेच ध्येय होते. दादांचं कामावरील प्रेम सर्वांना माहीत आहे, म्हणूनच दादांना आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. दादांना आवडणाऱ्या गोष्टी, लोकहिताची कामं आणि विकासाची गती कायम ठेवणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. म्हणूनच मी सगळं बाजूला ठेवून ही जबाबदारी स्वीकारली आहे.

advertisement

दादांच्या जाण्याने  पोरके झालो :सुनेत्रा पवार 

सुनेत्रा पवार यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.  राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना प्रोत्साहन आणि नवीन ऊर्जा देण्यासाठी भाषण करताना त्या भावूक झाल्या. दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत. तुम्ही दादांचे स्वप्न तुम्ही पूर्ण कराल याची खात्री आहे असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

advertisement

हे ही वाचा : 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याच्या दरात मोठी उलथापालथ, डाळींब आणि केळीला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

Ajit Pawar: दादा कामासाठी सकाळी लवकर उठून निघाले अन्... सुनेत्रा पवार अपघातावर 18 दिवसांनी पहिल्यांदाच बोलल्या

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डोक्यावर दु:खाचा डोंगर असताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली? सुनेत्रा पवारांनी सगळंच सांगितलं, पहिल्यांदाच मनातलं बोलल्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल