भाजप आमदार सुरेश धस टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. या मुलाखतीत सुरेश धस यांनी पंकजा मुंडे लोकसभेत नेमक्या कशा पडल्या? पंकजा मुंडे यांना कोणी पाडलं? याची माहिती दिली आहे. धनंजय मुंडेंपेक्षा आकाची (वाल्मिक कराड) दहशत जास्त आहे. आकाने (वाल्मिक कराड) धनंजय मुंडेंवर पुर्ण वशीकरण केलं आहे,असे सुरेस धस यांनी म्हटलं आहे.
advertisement
धनंजय मुंडेंचा मित्रच वाल्किम कराडने शिल्लकच ठेवला नाही. त्याने बरोबर सगळ्यांचे काटे काढले. बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे चांगले मित्र होते. या दोघांच्या मित्रत्वाचं वाटोळं विष्णु चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलं.तेव्हापासून बजरंग बाप्पा विरोधात गेला. बजरंग बाप्पा जर विरोधात गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभेला पडल्याच नसत्या,असा खळबळजनक खुलासा सुरेश धस यांनी केला.
सुरेश धस पुढे म्हणाले, बजरंग सारखा तगडा उमेदवार होता. बजरंग बाप्पा बोलेला अशी छाती फाडली तर या बाजूला अजित पवार दिसतील तर या बाजुला धनंजय मुंडे दिसतील. पण त्याची छातीही फाडायची गरज पडली नाही तो गेला उभा राहिला आणि आमचं सीट पडलं. त्यामुळे माझ्याबद्दल त्यांचा (पंकजा मुंडे) गैरसमज निर्माण झाली. माझ्यामुळेच का झाला माहित नाही, पण साडे 32 हजाराची मी लिड दिलं होतं, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
धनंजय मुंडेंचा हत्या प्रकरणात हात नसेल
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, या हत्या प्रकरणात आका आहे. पण आकाचा आका याचं इतक्या लवकर नाव नाही घेणार. यासाठी थोड थांबाव लागेल. इतक्या लवकर त्यांना लगेच आरोपी ठरवणे योग्य नाही. परंतू राजीनामा मात्र त्यांनी दिला पाहिजे. हे माझं प्रामाणिक मतं आहे. त्यांना राजीनामा द्यायला अजित पवारांनी भाग पाडावं, असं मला वाटतं,अशी भूमिका देखील सुरेश धसांनी मांडली.
आकाच्या (वाल्मिक कराड) आकाने (धनंजय मुंडे) व्हिडिओ पाहिला असेल तर त्याला जेलवारी झाली पाहिजे. पण मोठ्या आकाने (धनंजय मुंडे) व्हिडिओ पाहिला असेल असं मला वाटत नाही. माझं हदय सांगत धनंजय मुंडेंनी तो व्हिडिओ पाहिला असे मला वाटत नाही. पण आकाने शंभर टक्के पाहायला असेल, असे देखील सुरेश धसांनी स्पष्ट सांगितलं आहे.
