भाजप आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलत होते. यावेळी देशमुख हत्या प्रकरणाच्या दोन दिवस आधी सुरेश धस वाल्मिक कराडला भेटल्याचा दावा कराड कुटुंबियांनी केल्याचा सवाल माध्यमांनी केला होता. यावेळी कुटुंबाचा हा दावा सुरेश धस यांनी फेटाळत मी वाल्मिक कराडला मी नाही भेटलो, अशी स्पष्टोक्ती दिली. वाल्मिकसोबत माझं काय वाईट होतं. मात्र वाल्मिकसोबत माझे चांगले संबंध होते. पण वाल्मिक कराड या प्रकारे माणस मारायला लागला तर मग त्याच समर्थन करायचं का? दोस्त आहे, मैत्री आहे, पण असं वागायला लागल्यावर त्याच्यासोबत राहायचं का? असा प्रतिसवाल सुरेश धस यांनी माध्यमांना केला.
advertisement
तसेच आज वाल्मिक कराडला कोर्टात नेते जात असताना त्याने रोहित अशी हाक मारली? त्यामुळे हा रोहित नेमका कोण आहे? असा प्रश्न उपस्थित झाला.यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, रोहित हा त्याच्या हाताखालचा माणूस आहे. रोहित कांबळे करून. काय आता मदतीला वगैरे लागत असेल,असे धस यांनी सांगितले.
कराड समर्थकांकडून परळी बंदच्या घोषणेवर बोलताना सुरेश धस म्हणाले की, परळी बंद ही नाविन्यपूर्ण योजना आहे.आपला माणूस जेलमध्ये गेल्यानंतर ज्याने इतका मोठा उद्योग केला आहे. हा माणूस जेलमध्ये गेल्यानंतर बीड, परळी बंद करणे कितपत योग्य आहे. हा नवीन पायंडा आहे.इसके बाद जो भी जेल मे जाएगा, उसके लिए हम तुम्हारे साथ है. म्हणून आता शहर बंद करून टाकली. एखाद्यावेळेस मुंबईही बंद करून टाकतील, असा टोला धसांनी कराड समर्थकांना लगावला.
