TRENDING:

सोमवती अमावस्येला चाकणकरांनी करंगळीच्या शेजारचं बोट का कापलं? सुषमा अंधारेंनी फोटो दाखवले, कारणंही सांगितलं

Last Updated:

तंत्रमंत्र करणारा तंत्रज्योतिषी आणि काळी जादू करणारा अशोक खरात याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर अडचणीत आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संतोष गोरे, प्रतिनिधी, मुंबई : एप्स्टीन फाईलनं जगामध्ये आणि इकडे नाशिकमधल्या 'कॅप्टन फाईल्स'नं महाराष्ट्रात खळबळ उडालीय. एका भोंदूच्या विकृत कारनाम्यांनी समाजमन हादरलंय. महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. जेवढा संताप त्याच्या त्या अघोरीपणाचा आहे तेवढाच तो भोंदूवर राजकीय छत्रछाया धरणाऱ्या रुपाली चाकणकरांबद्दल आहे. कारण त्यांच्यावर होणारे आरोप. त्या भोंदूबद्दलची त्यांची जवळीक. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत मोठा राजकीय स्फोट केलाय.
सुषमा अंधारे-रुपाली चाकणकर
सुषमा अंधारे-रुपाली चाकणकर
advertisement

तंत्रमंत्र करणारा तंत्रज्योतिषी आणि काळी जादू करणारा अशोक खरात याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर अडचणीत आल्या आहेत. रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी आता तीव्र झाली आहे.

रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं. त्यातच रूपाली चाकणकरांमुळे खरातच्या विरोधातील तक्रारी घेतल्या गेल्या नाही, अशी माहिती समोर आली. एका पत्रकारावर दबाव टाकून त्याला माफी मागायला लावण्यात आली होती. त्यातच आता सुषमा अंधारे यांनी अत्यंत धक्कादायक दावा केलाय. 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी रुपाली चाकणकर यांनी स्वतःची अनामिका कापली होती, असा दावा अंधारेंनी केलाय. सोमवती अमावस्येला चाकणकरांनी अनामिका कापली. महिला आयोगाच्या अध्यक्षा तंत्रमंत्रात असणं गंभीर आहे, असे अंधारे म्हणाल्या. दाव्याची पुष्टी करण्यासाठी अंधारेंनी काही फोटोही दाखवले. त्यात चाकणकर यांच्या बोटाला बँडेज बांधलेलं स्पष्ट दिसतंय.

advertisement

सोमवती अमावस्येला चाकणकरांनी करंगळीच्या शेजारचं बोट का कापलं?

ज्या व्यक्तीवर तंत्र मंत्र करायचे आहे त्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या बाहुलीवर रक्त सांडले, तर सूर्य (यश) आणि शुक्र (आकर्षण) हे दोन्ही ग्रह अनुकूल होतात आणि आशीर्वाद देतात, असा समज आहे. रूपाली चाकणकर स्वत: तंत्रमंत्र करायच्या असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केला. रुपाली चाकणकरांना अटक करुन त्यांची नार्को टेस्ट करा. चाकणकर आणि खरातचे सीडीआर तपासा, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली.

advertisement

चाकणकरांचा अनामिका कापलेला पहिला फोटो साधारण ९ सप्टेंबर २०२४ रोजीचा आहे, ज्यात जखम मोठी दिसते. ही जखम सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत दिसत राहते. हे सगळे फोटो त्यांच्या फेसबुकवर असल्याचे अंधारे यांनी आवर्जून सांगितले. स्वयंपाकघरात झालेली जखम तीन-चार महिने राहत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ९ सप्टेंबरच्या आसपास काही विशेष होते का हे तपासल्यावर, २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्या होती, असे पंचांगानुसार कळते. त्यामुळे तर चाकणकरांनी अनामिका कापली नसेल ना.. असा प्रश्न अंधारे यांनी विचारला.

advertisement

चाकणकरांना पदावरून हटवणं गरजेचं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्षानं मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीचे दर काय?
सर्व पहा

अशोक खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकर अडचणीत आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चाललाय. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. थेट उत्तर देणं टाळलं. थातूरमातूर वक्तव्य करून सुनील तटकरेंनी पळ काढला. मात्र अशोक खरात हे प्रकरण गंभीर आहे. फक्त राजकीय आरोपच नव्हे तर महिलांचं यात शोषण झालेलं आहे. तंत्रमंत्र करून अनेकांची यात फसवणूक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य बाहेर येणं गरजेचं आहेत. तर खरातला शिक्षा होण्याच्या आधी चाकणकरांना पदावरून हटवणंही तितकंच गरजेचं आहे, असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केलाय.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोमवती अमावस्येला चाकणकरांनी करंगळीच्या शेजारचं बोट का कापलं? सुषमा अंधारेंनी फोटो दाखवले, कारणंही सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल