इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दोन्ही पक्षाकडून घेण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे. या निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री बाळा भेगडे तसेच सध्याचे आमदार सुनील शेळके या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राज्यात महायुती म्हणून सत्तेत एकत्र असले तरीही स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे.
अधिकृत उमेदवारांसमोर बंडोबांना थंड करण्याचे आव्हान
advertisement
तळेगाव नगर परिषदेत एकूण 14 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन असे एकूण 28 सदस्य असणार आहेत. यंदा नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातून असल्याने इच्छुकांची संख्या देखील जास्त आहे. या निवडणुकीत अनेक उच्चशिक्षित उमेदवार बंडखोरीच्या पवित्र्यात असून अधिकृत उमेदवारांसमोर बंडोबांना थंड करण्याचे आव्हान असेल. बंडखोरी ही भाजप तसेच राष्ट्रवादी समोरची डोकेदुखी ठरणार आहे.
...त्यांच्या विरोधात एका मिनिटात उमेदवार देणार-सुनील शेळके यांची खेळी
नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे दावेदार संतोष दाभाडे हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. परंतु त्यांना नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी पाठिंबा देऊन प्रोत्साहित केले आहे. संतोष दाभाडे यांनी भाजपचे कमळ हे चिन्ह न घेता निवडणूक लढविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही अशी खेळी सुनील शेळके यांनी खेळली आहे. परंतु दाभाडे यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यास नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडूनही त्यांचे विरोधात एका मिनिटात उमेदवार देऊ, असे सुनील शेळके यांनी सांगितले आहे.
