पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी थेट पक्षातून राजीनामा दिला. विभागप्रमुख आणि विभाग संघटक यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर एकच खळबळ उडाली. तेजस्वी घोसाळकर यांनी स्थानिक विभाग प्रमुख आणि संघटक यांच्या कार्यशैलीबाबत अनेक वेळा पक्षश्रेष्ठींना तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्या तक्रारींची कोणतीही दखल न घेतल्यामुळे अखेर त्यांनी थेट पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तेजस्वी घोसाळकरांच्या राजीनाम्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोसाळकरांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकरदेखील उपस्थित होते.
advertisement
उद्धव ठाकरेंसोबत भेटीत काय झालं?
तेजस्वी घोसाळकर यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, माझे काही मुद्दे पक्ष प्रमुखांच्या कानावर घातले आहे. त्यांनी माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं असल्याचे तेजस्वीनी यांनी सांगितले. माझे मुद्दे स्थानिक पातळीवर सुटतील असे वाटले होते. मात्र, तिकडं निराशा हाती आल्याचे त्यांनी सांगितले.
नाराजी दूर झाली का?
उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीनंतर तुमची नाराजी दूर झाली का, असं विचारल्यानंतर तेजस्वी यांनी सूचक वक्तव्य केले. माझी नाराजी दूर झाली का हे येत्या काही दिवसात समजेल असं सांगत तेजस्वी यांनी स्मित हास्य केले. आपण इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
दहिसर विभागात प्रभाव...
घोसाळकर कुटुंब-ठाकरे कुटुंब यांचे जवळचे संबंध आहेत. परंतु स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन तेजस्विनी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला. तेजस्वीनी घोसाळकर यांचे सासरे आणि ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा दहिसरमध्ये चांगला प्रभाव आहे. त्याशिवाय, तेजस्वीनी यांचे दिवंगत पती आणि त्या स्वत: नगरसेवक राहिले आहेत.