घटनेबाबत अधिक माहिती अशी की, समोरून येणाऱ्या दुचाकीला साईट देताना चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं, त्यानंतर ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या ओव्हळमध्ये कोसळली. या अपघातात सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैभववाडी -कुसुर मार्गावर हा अपघात झाला आहे.
advertisement
बसचं नुकसान
दरम्यान या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. नऊ प्रवासी जखमी झाले. तसेच बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
August 26, 2024 12:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ST bus accident : मोठी बातमी! सिंधुदुर्गमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस ओहाळात कोसळली!