TRENDING:

लेकरं, पोलिसांसमोर ठाकरे गटाच्या पदाधिकारी महिलेला निर्वस्त्र मारहाण, आता जीवन संपवण्याच्या स्टेट्सने खळबळ

Last Updated:

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यावरून गावात वाद उफाळला होता

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल खंडारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. पण, बुलडाण्यामध्ये  शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून चिखला गावात वाद उफाळला होता. यावेळी झालेल्या वादामध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या  महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण करण्यात आली होती. आता संजीवनी वाघ यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे.

advertisement

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यावरून गावात वाद उफाळला होता. उफाळलेल्या वादातून गावामध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या बुलढाणा महिला जिल्हा उपप्रमुख संजीवनी वाघ यांना देखील या वादात मारहाण झाल्याचं समोर आलं होतं. गावातील महिलांनी वाघ यांना मारहाण केली. निवस्त्र करत या महिलांनी त्यांना मारहाण केली. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे.

advertisement

या प्रकरणानंतर संजीवनी वाघ यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेट्स उद्या शनिवारी ७ वाजता आत्महत्या करणार असा मजकूर लिहिला आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने संजीवनी वाघ यांच्या घरी धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे बुलडाण्यात तणावपूर्ण वातावरण आहे.

advertisement

काय आहे प्रकरण? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या एक दिवस आधीच गावामध्ये खुल्या जागेवर अज्ञातांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र, हा पुतळा बसवल्यानंतर गावातील लग्न समारंभ करण्याकरता जागा उरणार नसल्याने हा पुतळा ग्रामपंचायतीमध्ये उभारावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. दरम्यान, मागणी करून देखील पुतळा हलवला जात नसल्याने हा वाद उफाळला असल्याचं बोललं जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लेकरं, पोलिसांसमोर ठाकरे गटाच्या पदाधिकारी महिलेला निर्वस्त्र मारहाण, आता जीवन संपवण्याच्या स्टेट्सने खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल