मीनाक्षी राजेंद्र शिंदे, याद्वारे माझ्याकडे असलेल्या 'ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हा संघटक' या पदाचा राजीनामा सादर करत आहे. आजवर पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पक्षाची आणि सर्व वरिष्ठ नेत्यांची ऋणी आहे. वैयक्तिक कारणास्तव (किंवा सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून), मी या पदावर काम करण्यास असमर्थ असून, मी माझ्या पदाचा त्याग करत आहे. कृपया माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा, ही विनंती, असे राजीनामा पत्रात मिनाक्षी शिंदे यांनी नमूद केले.
advertisement
वायचळ यांच्यावरील कारवाईमुळे मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा
शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून पक्ष विरोधी काम केल्याबद्दल, विक्रांत वायचळ शाखाप्रमुख निर्मल आनंदनगर (मनोरमा नगर) ठाणे, यांना काही दिवसांपूर्वी शाखाप्रमुख पदावरून निलंबित करण्यात आले होते. मनोरमा नगर प्रभाग क्रमांक तीनमध्ये शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनी स्थानिक नगरसेवकच हवा, अशी मोहीम उघडली होती. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. वायचळ हे मिनाक्षी शिंदे यांच्या निकटवर्तीय मानले जातात. त्याच कारणातून कलह होऊन मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
