न्यू ईयर पार्टीसाठी स्टायलिश वन पीस, फक्त 350 रुपयांपासून करा खरेदी, लूक बनेल भारी
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. वर्षाच्या शेवटच्या सणासुदीच्या काळात पार्टी, मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी आणि सेलिब्रेशनसाठी खास फॅशनची तयारी जोरात सुरू आहे.
मुंबई : मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. वर्षाच्या शेवटच्या सणासुदीच्या काळात पार्टी, मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी आणि सेलिब्रेशनसाठी खास फॅशनची तयारी जोरात सुरू आहे. अशाच वेळी दादर पश्चिम भागातील रानडे रोडवर तरुणींसाठी आकर्षक आणि परवडणाऱ्या दरातील फॅशनेबल वन पीस ड्रेस उपलब्ध झाल्याने खरेदीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दादर वेस्ट येथील रानडे रोडवर, भगत ज्वेलर्सच्या खाली असलेल्या एका स्टॉलवर विविध प्रकारचे वन पीस ड्रेस विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. खास बाब म्हणजे हे सर्व ड्रेस केवळ 350 रुपयांपासून उपलब्ध असून त्यामुळे कॉलेज तरुणी, नोकरी करणाऱ्या तरुणी तसेच फॅशनप्रेमी ग्राहक मोठ्या प्रमाणात येथे येत आहेत. महागड्या मॉल्स आणि बुटीकमध्ये मिळणाऱ्या ड्रेसच्या तुलनेत येथे कमी दरात ट्रेंडी आणि पार्टीसाठी योग्य असे कपडे मिळत असल्याने या स्टॉलची चर्चा सर्वत्र होत आहे.
advertisement
या स्टॉलवर व्हरायटीज ऑफ वन पीसेस उपलब्ध असून साध्या डेली वेअरपासून ते पार्टी वेअरपर्यंत अनेक डिझाइन्स पाहायला मिळतात. विशेष म्हणजे सर्व ड्रेस कॉटन फॅब्रिकमध्ये असल्याने ते परिधान करण्यास आरामदायी आहेत. साईजच्या बाबतीतही येथे पूर्ण सोय करण्यात आली असून S पासून XXL पर्यंत सर्व साईज उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील आणि शरीरयष्टीतील ग्राहकांना येथे आपापल्या योग्य पर्याय मिळत आहेत.
advertisement
दररोज दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हा स्टॉल सुरू असतो. सणासुदीच्या काळात तर संध्याकाळी येथे खरेदीदारांची विशेष गर्दी दिसून येते. कमी बजेटमध्ये स्टायलिश लूक हवा असलेल्या तरुणाईसाठी हा स्टॉल सध्या दादरमधील एक आकर्षण ठरत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 6:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
न्यू ईयर पार्टीसाठी स्टायलिश वन पीस, फक्त 350 रुपयांपासून करा खरेदी, लूक बनेल भारी







