घरची परिस्थिती हलाखीची, त्यात कचऱ्यात मिळालं सोनं, पण कचरा वेचक महिलेची ती कृती, Video पाहून कराल कौतुक

Last Updated:

कचरा संकलनाचं काम करणाऱ्या शालन लक्ष्मण वायला यांना काम करत असताना एक तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली. शालन यांनी कोणताही मोह न बाळगता त्यांनी ती प्रामाणिकपणे मूळ मालकाकडे सुपूर्द केली.

+
कचऱ्यात

कचऱ्यात मिळालं सोनं, आर्थिक अडचणी असूनही शालन वायला यांनी जपला प्रामाणिकपणा 

पुणे : पुण्यात माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या असतानाच, कचरा संकलनाचं काम करणाऱ्या शालन लक्ष्मण वायला यांना काम करत असताना एक तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली. शालन यांनी कोणताही मोह न बाळगता त्यांनी ती प्रामाणिकपणे मूळ मालकाकडे सुपूर्द केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचं कौतुक सध्या सगळीकडे होत आहे. हा सगळा घटनाक्रम त्यांनी लोकल 18 ला सांगितला आहे.
नेमकी घटना काय घडली?
पुण्यातील प्रियांका जगदाळे यांची ही अंगठी होती. सकाळी मुलाचा टिफिन बनवण्याच्या घाईगडबडीत प्रियांका यांनी आपली अंगठी बाजूला काढून ठेवली आणि घरातील कचरा गोळा करत असताना ती चुकून कचऱ्याच्या डब्यात टाकली. काही काळानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली अंगठी हरवली आहे. त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली.
advertisement
अखेर अंगठीचा शोध लागला कसा?
शालन वायला या गेल्या 10 वर्षांपासून कचरा वेचकाचं काम करत आहेत. 22 डिसेंबरला नेहमीप्रमाणे मंगळवार पेठ या भागात कचरा गोळा करण्याचं काम करत होत्या. त्यांनी घरोघरी जाऊन कचरा गोळा केला आणि त्यानंतर त्या गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी बसल्या. कचरा बाजूला काढत असताना त्यांना अचानक एक सोन्याची अंगठी सापडली. ही अंगठी सुमारे 10 ग्रॅम (एक तोळा) वजनाची होती. त्यांनी त्या अंगठीच्या मूळ मालकाचा म्हणजे प्रियांका जगदाळे यांचा शोध घेतला आणि त्यांच्याकडे ती सुपूर्द केली. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना देखील त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा माणुसकी अजून जिवंत असल्याचं उदाहरण आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
घरची परिस्थिती हलाखीची, त्यात कचऱ्यात मिळालं सोनं, पण कचरा वेचक महिलेची ती कृती, Video पाहून कराल कौतुक
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement