दहावीत शिकणाऱ्या मुलीने शाळेतच उचललं टोकाचं पाऊल, आदिवासी शाळेत चाललंय काय?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेत शिकणारी कोमल खाकर ही १७ वर्षीय विद्यार्थिनीने आज पहाटे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
सुनील घरत, प्रतिनिधी, ठाणे : मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील शहापूर एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. या आश्रम शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या कोमल खाकर या १७ वर्षीय विद्यार्थिनीने आज पहाटे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेत शिकणारी कोमल खाकर ही १७ वर्षीय विद्यार्थिनीने आज पहाटे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कोमल ही इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होती. मात्र, तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास विभागाचे प्रभारी प्रकल्प अधिकारी काळपांडे यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली आहे. तसेच टोकावडे पोलीस आश्रम शाळेत दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
या घटनेमुळे शालेय प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण याच आश्रम शाळेत यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्याची योग्य काळजी घेतली जात होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, मृत विद्यार्थिनीचे नातेवाईक आश्रम शाळेत दाखल झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी नातेवाईकांकडून होत आहे.
view commentsLocation :
Murbad,Thane,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 2:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दहावीत शिकणाऱ्या मुलीने शाळेतच उचललं टोकाचं पाऊल, आदिवासी शाळेत चाललंय काय?









