'आशा'नंतर महिन्याभरातच रिंकू राजगुरूची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री, अशोक मामांसोबत करणार स्क्रिन शेअर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
आशा सिनेमानंतर रिंकू राजगुरू नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर ती स्क्रिन शेअर करणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आता तब्बल एकोणीस वर्षांनंतर, त्याच आठवणींना उजाळा देत आणि आजच्या काळाशी जुळवून घेत 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंकुश चौधरी यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाच्या हातात ही कथा पुन्हा एकदा साकारली जात असल्यामुळे, या वेळी हास्याबरोबरच कथेतली पकडही तितकीच भक्कम असणार यांचा अंदाज येतोय.
advertisement
अंकुश चौधरीची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा आणि संवाद आहे. सिनेमात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे. पुन्हा साडे माडे तीन हा सिनेमा 30 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे.









