‘क्राइम पेट्रोल’ पेक्षा भयानक! पतीसोबत वाद झाला, तिने थेट काटाच काढला, दिराला..., बीडमध्ये खळबळ

Last Updated:

Beed News: पती-पत्नीचा वाद हा प्रकार काही नवीन नाही. परंतु, बीडमधील महिलेनं टोकाचं पाऊल उचललं अन् पतीला कायमचं संपवलं.

beed news: ‘क्राइम पेट्रोल’ पेक्षा भयानक! पतीसोबत वाद झाला, तिने थेट काटाच काढला, दिराला..., बीडमध्ये खळबळ (Ai Photo)
beed news: ‘क्राइम पेट्रोल’ पेक्षा भयानक! पतीसोबत वाद झाला, तिने थेट काटाच काढला, दिराला..., बीडमध्ये खळबळ (Ai Photo)
बीड: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडलीये. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद गावात पत्नीनेच पतीचा जीव घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या प्रकरणी अहमदपूर पोलिसांनी आरोपी पत्नीस अटक करून न्यायालयात हजर केले असता, तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सातत्याने सुरू असलेल्या घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या घटनेत प्रशांत प्रकाश गायकवाड (वय 36, रा. शिरूर ताजबंद) यांचा मृत्यू झाला आहे. प्रशांत आणि त्यांची पत्नी अर्चना यांच्यात गेल्या काही काळापासून सतत वाद होत होते. या वादांमुळे अर्चना दीड वर्षांपर्यंत माहेरी राहात होत्या. सुमारे पाच महिन्यांपूर्वी त्या पुन्हा पतीकडे नांदायला आल्या; मात्र जुन्या भांडणांचे पडसाद कायम राहिले. याच तणावपूर्ण वातावरणातून या घटनेची बीजे रोवली गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
advertisement
रागाच्या भरात पत्नीने...
घटनेच्या दिवशी प्रशांत दारूच्या नशेत असल्याचे तपासात समोर आले आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून अर्चनाने प्रशांतचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर दोरीच्या साहाय्याने गळा आवळून त्याचा खून करण्यात आला, अशी कबुली आरोपीने पोलिस चौकशीत दिली आहे. मात्र सुरुवातीला अर्चनाने वेगळीच कथा मांडत, पती मारहाण करीत असल्याने स्वसंरक्षणासाठी ढकलले आणि तो पडून जखमी झाला, असा दावा केला होता.
advertisement
मृताच्या शरीरावरील जखमा, विशेषतः गळ्यावरील खुणा पाहता पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव यांच्यासह पथकाने कसून चौकशी केल्यानंतर अर्चनाने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी मयताचा भाऊ प्रवीण गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार व त्यांचे पथक तपास करत आहे.
advertisement
दरम्यान, घटनेनंतर अर्चनाने प्रशांत बेशुद्ध पडल्याचे सांगत दीर प्रवीण गायकवाड यांना फोन करून घरी बोलावले होते. तत्काळ प्रशांतला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घरगुती वादातून टोकाचा निर्णय घेतल्याने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला असून, या घटनेची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
‘क्राइम पेट्रोल’ पेक्षा भयानक! पतीसोबत वाद झाला, तिने थेट काटाच काढला, दिराला..., बीडमध्ये खळबळ
Next Article
advertisement
Mumbai Crime : दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, रागाच्या भरात पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर
दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर
  • दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर

  • दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर

  • दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर

View All
advertisement