ठाकरे बंधूंच्या मुंबईतील युतीमुळे यंदा प्रथमच राज्याच्या विविध महापालिकांत मनसे-सेना युती झाली आहे. ठाण्यातही सेना-मनसे एकत्र लढत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची शक्ती वाढल्याचे चित्र आहे. परंतु अर्ज दाखल करण्याच्या एक दिवसाआधीच मनसेला मोठा धक्का बसला आहे.
अविनाश जाधवांचे जीवलग सहकारी राष्ट्रवादीत!
प्रीतीश मोरे आणि जयेश खटके हे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालय असलेल्या नौपाडा विभागात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असून अविनाश जाधव यांच्या अनेक आंदोलनात आणि उपोषणात त्यांचा सक्रिय भूमिका राहिली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनगटावर घड्याळ बांधल्याने अविनाश जाधव यांना मोठा धक्का समजला जातोय.
advertisement
भाजप शिवसेनेची मोठी खेळी
ठाण्यात शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील आनंदमठ येथे उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपा शिवसेनेने मोठी खेळी खेळली आहे. ठाण्यातील इच्छुकांना मुंबईत बोलावून एबी फॉर्म वाटले. कोणताही गाजावाजा न करता उद्या अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, काहींना आज रात्री उशीरापर्यंत एबी फॅार्म चे वाटप करण्यात आले. निवडणुकीची जबाबदारी असलेले भाजपा शिवसेनेचे नेते ठाण्याच्या बाहेर आहेत. एबी फॅार्म ज्यांना दिले जाणार आहे त्यांना अज्ञात स्थळी बोलावून दिले जात आहेत. नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्यांनी बंडखोरी करू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. काठावरच्या लोकांना मनसे, शिवसेना ठाकरे गट पर्याय असल्याने ते बंडखोरी करू शकतात, हे लक्षात घेऊन भाजप शिवसेनेने मोठी खेळी खेळली आहे.
