कुणाला कुठे संधी?
33 प्रभागांमधील एकूण 131 जागांपैकी 66 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील 9 जागांपैकी 5 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील 3 जागांपैकी 2 महिला प्रवर्गासाठी राखीव तर एक ओपन ठेवण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) अंतर्गत 17 पैकी 9 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील 35 पैकी 18 जागा महिलांसाठी राखीव आहेत तर 17 सर्वसाधारण आहेत. 84 पैकी 41 महिला 43 प्रवर्गनिहाय आहेत.
advertisement
नागरिकांना या संदर्भात काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या 16 ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयात दाखल करता येतील, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे.
आरक्षण सोडतीविषयी ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव म्हणाले...
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव आरक्षण सोडतीविषयी माहिती देताना म्हणाले, आरक्षण सोडत सर्वांच्या साक्षीने संपन्न झाली. माननीय निवडणूक आयोगाने या सोडतीची कार्यपद्धती निश्चित करून दिलेली आहे. याचे तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया पार पाडली आहे. आपल्याला कल्पना आहे की ठाणे महानगरपालिकेचे जे क्षेत्र आहे त्यामध्ये १३१ प्रभाग आहे. त्यानुसार एक एक करून आरक्षण सोडत काढली गेली. शिक्षण घेणाऱ्या लहान मुलीकडून पूर्ण पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली आहे. निवडणूक प्रक्रियेला प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा मिळणार आहे. यामध्ये प्रशासनाचे दोन्ही घटक असून यामध्ये अधिकारी आणि निवडून आलेले जनप्रतिनिधी आहे. ते एकमेकांना सहकार्य करून लोकशाहीचे मूलभूत तत्त्व पाळण्याचे काम करतील.
