संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मराठी मतदारांचा टक्का मजबूत असल्यामुळे उमेदवारही मराठीच आहेत. भिवंडीमध्ये समाजवादी पक्ष आणि उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांच्या पक्षानेही मराठी उमेदवारांना प्राधान्य दिलं आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे 40 पैकी 30 उमेदवार मराठी आहेत, तर उरलेल्या 10 उमेदवारांमध्ये 5 जण मुस्लिम, दोन उत्तर भारतीय, एक गुजराती, एक पंजाबी आणि एक दक्षिण भारतीय उमेदवार आहे.
advertisement
मनसेने ठाण्यामध्ये सगळेच उमेदवार मराठी दिले आहेत. तर शिवसेनेने एक उत्तर भारतीय, एक शीख आणि एका सिंधी उमेदवाराला तिकीट दिलं आहे, त्यांचे उरलेले सगळे उमेदवार मराठी आहेत. दुसरीकडे शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही.
कल्याण-डोंबिवलीचं चित्र काय?
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपचे 54 पैकी 51 उमेदवार मराठी आहेत, तर दोन उत्तर भारतीय आणि एक गुजराती उमेदवार आहे.
भिवंडीत कुणाचे किती उमेदवार?
मुस्लिम मतदार जास्त असलेल्या भिवंडीमध्ये भाजपने फक्त एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं आहे. भाजपचे 30 पैकी 21 उमेदवार मराठी, 3 उमेदवार जैन, गुजराती आणि मारवाडी, चार उमेदवार तेलुगू आणि एक उमेदवार उत्तर भारतीय आहे.
उल्हासनगरमध्ये भाजप स्वबळावर
उल्हासनगरमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे. भाजपने 78 पैकी 38 उमेदवार मराठी, 28 उमेदवार सिंधी, 10 उत्तर भारतीय आणि 2 शिख उमेदवार दिले आहेत.
मुंबईत किती मराठी उमेदवार?
भाजपने मुंबईमध्ये 137 पैकी 92 मराठी उमेदवार दिले आहेत, तर काँग्रेसने 63, मनसेने 49, राष्ट्रवादीने 65, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने 9 उमेदवार मराठी दिले आहेत.
