TRENDING:

'गणपत गायकवाडच्या फरार मुलाची टीप द्या, 25 हजार मिळवा', शिंदे गटाच्या माजी नेत्यानं लावली फिल्डिंग

Last Updated:

शिवसेना शिंदे गटाचे माजी नेते महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा खोडके यांच्या मुलाला पकडण्यासाठी २५ हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण: शिवसेना शिंदे गटाचे माजी नेते महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा खोडके यांच्या मुलाला पकडण्यासाठी २५ हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ११ महिन्यापूर्वी कल्याण पूर्वेच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडली होती. भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे तत्कालीन नेते महेश गायकवाड यांच्यासह त्याचे साथीदार राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. गणपत गायकवाड यांनी जवळपास ६ राऊंड फायर केले होते.
News18
News18
advertisement

या हल्ल्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते, त्यांच्या पाठीला आणि पोटाला गोळ्या लागल्या होत्या. उपचारानंतर आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र या गोळीबार प्रकरणी तीन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. याच पार्श्वभूमीवर महेश गायकवाड यांनी माजी आमदार गणपत गायकवाड आणि विद्यमान आमदार सुलभा गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड आणि इतर दोन आरोपींचा पत्ता सांगणाऱ्यांना २५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

advertisement

याबाबत एक पोस्टरही महेश गायकवाड यांनी रिलीज केलं आहे. यात पोस्टरमधून त्यांनी वैभव गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांची माहिती देणाऱ्याला २५ हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा केली आहे. एका विद्यमान आमदाराच्या फरार मुलाला पकडण्यासाठी चक्क शिंदे गटाच्या माजी नेत्याने अशाप्रकारे बक्षीस जाहीर केल्यानं कल्याणमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. महेश गायकवाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय देखील मानले जातत. त्यामुळे कल्याणमध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिंदे गट वादाला सुरुवात होऊ शकते.

advertisement

११ महिन्यांपूर्वी हिललाइन पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्यानंतर तत्कालीन आमदार गणपत गायकवाड याच्यासह एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. आता यातील तीन आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड आणि इतर दोन साथीदार अद्याप फरार आहे. आरोपी भाजपशी संबंधित असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही महेश गायकवाड यांनी केला आहे. पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने स्वत: महेश गायकवाड यांनीच बक्षीस जाहीर केल्याने कल्याणमधील वातारण तापताना दिसत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
'गणपत गायकवाडच्या फरार मुलाची टीप द्या, 25 हजार मिळवा', शिंदे गटाच्या माजी नेत्यानं लावली फिल्डिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल