TRENDING:

Thane-Navi Mumbai Airport: ठाणे ते नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत! विमानतळाकडे जाणाऱ्या एलिव्हेटेड रोडला मंजुरी

Last Updated:

Thane-Navi Mumbai Airport: नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे आणि आसपासच्या परिसरात कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ उभारलं जात आहे. या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. याठिकाणाची रस्ते मार्गे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी विविध पर्याय शोधले जात आहे. याअंतर्गत ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 25 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, नवी मुंबई आणि औद्योगिक क्षेत्रांना वेगवान मार्ग उपलब्ध होणार आहे.
Thane-Navi Mumbai Airport: ठाणे ते नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत! विमानतळाकडे जाणाऱ्या एलिव्हेटेड रोडला मंजुरी
Thane-Navi Mumbai Airport: ठाणे ते नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत! विमानतळाकडे जाणाऱ्या एलिव्हेटेड रोडला मंजुरी
advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या याच बैठकीत ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान एलिव्हेटेड रोड उभारण्यास मंजुरी देण्यात आली.

Navi Mumbai Airport: महापालिका निवडणुकांपूर्वीच उडणार विमान! महायुती सरकारची जोरदार मोर्चेबांधणी

advertisement

नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे आणि आसपासच्या परिसरात कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान एलिव्हेटेड रोड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर हे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत. येत्या काही दिवसांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमान उड्डाणाला सुरुवात होणार आहे. नवी मुंबईतील दळणवळण व्यवस्थेचा अधिक चांगली करण्याचा मुद्दा सिडकोने अधोरेखित केला. दळणवळण यंत्रणेत एक्सप्रेस वे, जोडरस्ते, मुख्य रस्ते, आणि स्थानिक रस्ते अशी रचना करण्यात आली आहे.

advertisement

वाहतूक कोंडीतून होणार सुटका

ठाणे शहर आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडण्यासाठी ठाणे-बेलापूर आणि पाम बीच मार्ग असे दोन पर्याय आहेत. मात्र, या मार्गांवर भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते. ही समस्या टाळण्यासाठी ठाण्याहून थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत विनाअडथळा पोहोचण्यासाठी एलिव्हेटेड रोड बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कसा असेल मार्ग?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

ठाण्याहून थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत जाणारा हा दिघ्यातील पटणी चौकापासून सुरू होणार आहे. या मार्गाचा पहिला टप्पा पटणी चौक ते वाशीपर्यंत 17 किलोमीटरचा असेल. हा मार्ग ठाणे-बेलापूर मार्गाला समांतर असेल. वाशीपासून पुढे नवी मुंबई विमानतळापर्यंतचा मार्ग हा एलिव्हेटेड असेल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane-Navi Mumbai Airport: ठाणे ते नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत! विमानतळाकडे जाणाऱ्या एलिव्हेटेड रोडला मंजुरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल