याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली वेस्टमधील गणेशनगरमध्ये पेट्रोल पंप नागरिकांच्या सोयीसाठी 24 तास सुरू ठेवला जात होता. मात्र, काही मद्यपी रात्रीच्या सुमारास पंपावरील कामगारांना दमदाटी करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पंपचालकाने आपल्या कामगारांच्या सुरक्षेसाठी रात्री 11 नंतर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Local: प्रवासी सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा मेगाप्लॅन! या दिवशी नवीन रुपात धावणार नॉन-एसी लोकल
advertisement
गणेशनगरमधील हा पंप सतत सुरू असल्याने रात्री-अपरात्री इंधनाची अडचण आल्यास नागरिकांना मदत होत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी रात्रीच्या सुमारास गुंड मद्यपी येऊन कर्मचाऱ्यांना त्रास देतात. त्यांना शिवीगाळी करून दमदाटी करतात. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर पंपचालकाने पेट्रोल पंप रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
गुंडगिरी करणाऱ्या मद्यप्यांमुळे मराठी व्यावसायिकाला पेट्रोल बंद ठेवावा लागत असेल तर मनसे संरक्षण देईल, असं मनसेचे कल्याण उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे म्हणाले आहेत. गुंडांकडून असा त्रास दिला जात असेल तर शहरातील लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन काय करत आहे? असा प्रश्नही गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे.
अनेक वर्षे डोंबिवली वेस्टमध्ये पेट्रोल पंप नव्हते. त्यामुळे नागरिकांना पेट्रोलसाठी पूर्वे भागात जावं लागत होतं. काही वर्षांपूर्वी भागशाळा आणि गणेशनगरमध्ये दोन पेट्रोल पंप सुरू झाले. तेव्हापासून नागरिकांच्या इंधनाचा प्रश्न सुटला होता. मात्र, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे आता पुन्हा गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.