13 आणि 14 ऑक्टोबर रोजी भवानी ज्योत येणार असल्याने आणि 15 ते 24 ऑक्टोबर नवरात्र उत्सव असल्याने तसेच 28 ते 30 ऑक्टोबर काळात अश्विन पौर्णिमा/असल्याने वेळेत बदल करण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिर रात्री 11 वाजता बंद होऊन पहाटे 1 वाजता चरणतीर्थ होऊन मंदीर दर्शनासाठी उघडले जाणार आहे. अभिषेक आणि पूजा सकाळी 6 ते 10, सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली आहे.
advertisement
तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे भाविकांना आता 22 तासात कधीही मातेचं दर्शन घेता येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
October 13, 2023 9:40 AM IST