TRENDING:

Palghar: आठवडी बाजार घरी न्यायचाच राहिला, 24 वर्षीय पोराचं पिकअप शिकणं दोघींच्या जिवावर बेतलं, पालघरमधील घटना

Last Updated:

पालघरहून आठवडी बाजार करून लता तरे आणि बेबी जाधव या दोन महिला पायी घराकडे निघाल्या होत्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल पाटील, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पालघर :  पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  पालघर नंडोरे मार्गावर भीषण अपघात झाला आहे. आठवडी बाजार करण्यासाठी गेलेल्या दोन पादचारी महिलांना भरधाव पिकअपने चिरडलं आहे. या अपघातात दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, चालक हा शिकत होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर-नंडोरे या मार्गावर दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. लता निलेश तरे (वय 45) आणि बेबी चंद्रकांत जाधव (वय 65) असं मृत महिलांची नावं आहे.  आठवडी बाजार आटपून घराकडे पायी निघालेल्या या दोन्ही महिलांना  एका भरधाव पिकअपने चिरडलं.

advertisement

या अपघातात लता निलेश तरे आणि बेबी चंद्रकांत जाधव या  दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला झाला आहे. पालघरहून आठवडी बाजार करून लता तरे आणि बेबी जाधव या दोन महिला पायी घराकडे निघाल्या होत्या. घराकडे जात असताना नंडारे मार्गावर अचानक समोरून आलेल्या भरधाव पिक अपने या दोन्ही महिलांना जोराची धडक दिली. दोन्ही महिलांना धडक दिल्यानंतर पिकअप झाडाला जाऊन आदळली.

advertisement

२४ वर्षांचा शिकाऊ चालक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पाय गमावला Cricket सोडलं नाही! व्हिलचेअरवर मॅच खेळणाऱ्या ओंकारची गोष्ट!
सर्व पहा

पिकअप चालवणारा एक २४ वर्षीय शिकाऊ तरुण होता. पिकअप चालवत असताना अचानक त्यांचं गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावरून समोरून येणाऱ्या दोन्ही महिलांना चिरडून पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला आदळला. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली आणि चालकाला पकडलं. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृत महिलेचे मृतदेह हे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पालघर पोलिसांनी पिक अप चालकाला ताब्यात घेतलं असून सध्या पालघर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Palghar: आठवडी बाजार घरी न्यायचाच राहिला, 24 वर्षीय पोराचं पिकअप शिकणं दोघींच्या जिवावर बेतलं, पालघरमधील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल