उदय सामंत माध्यमांशी बोलत होते. यावेळी महायुतीच्या खातेवाटपावर बोलताना सामंत म्हणाले की,खातेवाटपामध्ये कुठेही तिढा नाही आणि कुठेही समन्वय नाही अशातली भावना नाही.तीनही नेते एकत्र बसून याबाबतचा निर्णय घेतील. तसेच विरोधकांनी खात्याचा मंत्रीच नाही तर आम्ही प्रश्न कुणाला विचारायचा? असा सवाल केला होता, यावर बोलताना सामंत म्हणाले की,या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा त्रास नाही आहे. लक्षवेधी देखील नाही आहे. परंतू महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत असलेले विकासात्मक प्रश्न विरोधकांनी विचारले तर त्यांना अभिप्रेत असलेले उत्तर द्यायला सरकार तयार आहे. मंत्रिमंडळाच जरी खातेवाटप झालं नसलं तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्री हे सक्षम आहेत, त्यामुळे लवकरा लवकर खातेवाटप होईल,असे उदय सामंतांनी सांगितले आहे.
advertisement
छगन भुजबळांच्या नाराजीवर बोलताना उदय सामंत म्हणाले की,राष्ट्रवादीचा तो अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणे काही योग्य नाही. त्यामुळे त्यांच्याबाबतचा योग्य तो निर्णय अजितदादा घेतील, असे त्यांनी सांगितले.
तानाजी सावंत देखील मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत, यावर बोलताना सामंत म्हणाले की, एखाद्याला मंत्रिपद मिळालं नाही तर नाराजी होऊ शकते. परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. तसेच आम्ही जे मंत्री झाला आहोत, त्यांची देखील इतर नेत्यांची नाराजी दुर करण्याची जबाबदारी आहे.त्यासाठी आमचं काम सूरू आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे आमच्यासाठी ज्येष्ठ आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांची समजूत काढतील, असे उदय सामंत यांनी सांगितले आहे.
