वाढदिवसाच्या निमीत्त भरवण्यात आलेल्या शाहु स्टेडीयम येथील कै प्रतापसिंह महाराज चषकाच्या ठिकाणी भला मोठा केक कापून आणि फटाके फोडून वाढदिवस साजरा करण्यात आला. उदयनराजे यांना कार्यकर्त्यांनी तलवार भेट दिली ही तलवार राजेंनी स्वत: च्या स्टाईल मध्ये म्यानातून बाहेर काढत उपस्थितांची मनं जिंकली.
उदयनराजे यांनी ' मला जाऊद्याना घरी वाजले की बारा' असं उपस्थितांना म्हणताच याठिकाणी एकच जल्लोष झाला. खासदार उदयनराजे त्यांच्या हटके स्टाईलसाठी आणि त्यांच्या डायलॉगसाठी प्रसिद्ध आहेत. कधी साउथ स्टाईल तर कधी गोगलची स्टाईल तर कधी गाडी चालवताना मारलेला हटके डायलॉग यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
यावेळी उदयनराजे यांनी कार्यकर्ते आणि खेळाडूंशी संवाद साधला. त्यांनी पराभूत झालेल्यांना आपल्या डायलॉगने बळ दिलं आणि त्यानंतर कार्यकर्ते आणि खेळाडूंनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या.