TRENDING:

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?

Last Updated:

Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis :महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. खरं तर उद्धव ठाकरे आज नागपूरला अधिवेशनानिमित्त दाखल झाले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांनी फडणीवसांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत अनेक शिवसेनेचे नेते उपस्थित होते. विषेश म्हणजे या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही आहे. त्यामुळे भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे.
 uddhav Thackeray meet Devendra Fadnavis
uddhav Thackeray meet Devendra Fadnavis
advertisement

नागपूरमध्ये पार पडत असलेल्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे आमदार वरूण देसाई आणि अनिल परब  या नेत्यांसह दुपारच्या सुमारास फडणवीसांच्या भेटीला गेले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही भेट घेतल्याची माहिती आहे. शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मात्र या शपथविधीला ठाकरे जाऊ शकले नव्हते. त्यामुळेत उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा देण्यासाठी आजची भेट घेतल्याची सुत्रांची माहिती आहे.

advertisement

दोन्ही नेत्यांच्या भेटीत काय झाली चर्चा? 

मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. ठीक आहे आम्ही निवडणुक जिंकू शकलो नाही.ते जिंकले आणि त्याचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे साहाजिकच आहे या सरकारकडून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे,असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच जे निवडणुकीचे निकाल लागले आहेत, ते अनाकलनीय आहेत त्यामुळे जनतेच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात आवाज उठवू, अशी भूमिका देखील उद्धव ठाकरे यांनी मांडली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्य़क्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते कोणाचा असावा यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान राहुल नार्वेकर आणि देवेंद्र फडणवासांची ठाकरेंनी अचानक भेट घेतल्यानंतप चर्चांना उधाण आले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल