TRENDING:

'निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली...', सज्जाद नोमानींचा मविआला पाठिंबा, भाजपने शेअर केला Video

Last Updated:

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजप ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या व्हिडिओवरून आक्रमक झाली आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या सज्जाद नोमानी यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले यांना पाठिंबा दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजप ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या व्हिडिओवरून आक्रमक झाली आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या सज्जाद नोमानी यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले यांना पाठिंबा दिला आहे. हमारा निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली है, असं म्हणणारा सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नोमानी यांच्या या व्हिडिओवर आशिष शेलारांनी सडकून टीका केली आहे. तसंच आशिष शेलारांकडून एक है तो सेफ है चा पुनरुच्चार करण्यात आला आहे.
'निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली...', सज्जाद नोमानींचा मविआला पाठिंबा, भाजपने शेअर केला Video
'निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली...', सज्जाद नोमानींचा मविआला पाठिंबा, भाजपने शेअर केला Video
advertisement

सज्जाद नोमानींच्या व्हिडिओमध्ये काय

महाराष्ट्रात त्यांचा पराभव झाला तर दिल्लीतील सरकारही फार काळ टिकणार नाही. आमचा निशाणा फक्त महाराष्ट्र सरकार नाही, तर दिल्ली आहे, असं विधान सज्जाद नोमानी यांनी केलं आहे. तसंच सिपेसालार शरद पवार आहेत आणि उद्धव ठाकरे, राहुल गांधी नाना पटोले अझीम सिपाही आहेत, असंही सज्जाद नोमानी म्हणाले आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी सज्जाद नोमानी यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

advertisement

'2 तासांपूर्वी त्यांच्या अधिकृत युट्युब हँडलवर हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. उघडा डोळे, बघा नीट... म्हणूनच एक है तो सेफ है... एक है तो नेक है...', असं म्हणत आशिष शेलार यांनी मतदारांना आवाहन केलं आहे.

advertisement

नोमानींचा महाविकास आघाडीला पाठिंबा

ऑल इंडिया एकता फोरमनं मविआच्या 269 उमेदवारांना पाठिंबा दिलाय. मराठा आणि ओबीसी समाजातील 170 उमेदवारांना पाठिंबा देण्यात आलाय. एससी, एसटी प्रवर्गातील 53 उमेदवार, इतर प्रवर्गातील 40 आणि 23 मुस्लिम उमेदवारांनाही पाठिंबा देण्यात आलाय. पाठिंबा देत असतानाच ऑल इंडिया एकता फोरमनं काही मागण्यांचं पत्र मविआला पाठवलंय.

ऑल इंडिया एकता फोरमच्या मागण्या

1 वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध

2 नोकऱ्या आणि शिक्षणात मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण

3 2012-2024 मध्ये दंगलीच्या आरोपात तुरुंगात टाकलेल्या निरपराध मुस्लिमांची सुटका

4 महाराष्ट्रातील 48 जिल्ह्यांतील मशीद, दर्गा आणि स्मशानभूमीचे सर्वेक्षण

5 वक्फ बोर्डाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्षानं मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीचे दर काय?
सर्व पहा

अशा मागण्या ऑल इंडिया एकता फोरमकडून करण्यात आल्या आहेत. तर पाठिंबा देणाऱ्या संघटना तालिबानी मानसिकतेच्या असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय. हिंदू राष्ट्रात फतवे चालणार नाही, असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली...', सज्जाद नोमानींचा मविआला पाठिंबा, भाजपने शेअर केला Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल