एकीकडे ऋतुराज पाटील या पुतण्याचा पराभव झालेला असतानाच बारामतीमध्ये आणखी एक पुतण्या पराभवाच्या छायेत आहे. अजित पवारांविरोधात पुतण्या युगेंद्र पवार 38 हजार मतांनी पिछाडीवर आहे. तर माहिममधून उद्धव ठाकरेंचे पुतणे आणि राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेही पराभवाच्या छायेत आहेत. माहिमच्या तिरंगी लढतीमध्ये अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
महायुतीची त्सुनामी
advertisement
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीची त्सुनामी आली आहे. महाराष्ट्रात भाजपने लागोपाठ तिसऱ्यांदा तीन आकडी संख्या गाठली आहे. 124 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर शिवसेना 55 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे 20 जागांवर, काँग्रेस 19 जागांवर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 13 जागांवर आघाडीवर आहे. तर 20 जागांवर इतर पक्ष आणि अपक्ष आघाडीवर आहेत.
