अकोले : गद्दार शब्दावरून धनंजय मुंडे यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. तुतारीच्या आदर्श नेतृत्वाने शाहू कोण आणि गद्दार कोण, हे आम्हाला सांगावे? 78 पासून त्यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे, पण त्यांनी केलं तर गद्दारी नाही. त्यांच्याच सांगण्यावरून दादा आणि आम्ही केलं तर आम्ही गद्दार, असं म्हणत धनंजय मुंडेंनी शरद पवारांनी पलटवार केला आहे.
advertisement
'अजितदादा आणि आम्ही कुणासोबत गद्दारी केली नाही. आमचं इमान मायबाप जनतेशी आहे. जनतेला विकासाचं जे स्वप्न दाखवलं ते पूर्ण करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो. 2019 ला भाजप-शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळालं होतं, पण काय खेळ झाला बघा. भाजपपासून कुणाला फोडलं? त्याला काय म्हणतात, त्याला गद्दारी म्हणत नाहीत? गद्दार कोण, तर आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते. ते मोठे, त्यांनी काहीही केलं तर जमते', असं प्रत्युत्तर धनंजय मुंडेंनी दिलं आहे.
धनंजय मुंडेंचं पवारांना आव्हान
समोरासमोर बसायचं असेल तर धनंजय मुंडेंची तयारी आहे, असं आव्हानही धनंजय मुंडेंनी शरद पवारांना दिलं आहे. 2017 पासून दिल्लीत काय झालं ते दादांचा शपथविधी के महाविकास आघाडी सरकार येण्यापर्यंत काय झालं? हे पुराव्यानिशी सिद्ध करेल. आम्हाला गद्दार म्हणू नका. 78 पासून महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी कुणी केली? हे सर्वांना माहिती आहे, असं टीकास्त्र धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर डागलं आहे.
आम्ही पुरोगामी विचारांशी कुठलीही तडजोड न करता महायुतीत सहभागी झालो, फक्त विकासासाठी, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथल्या सभेत धनंजय मुंडे बोलत होते.
