वाल्मिक कराडला आज बीडच्या कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. यावेळी एसआयटीने कराडची कस्टडी मिळवण्यासाठी कोर्टात जोरदार युक्तीवाद केला होता. यावेळी एसआयटीने कोर्टासमोर 9 बाबी मांडल्या होत्या. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णु चाटे यांच्यात संभाषण झाले होते. तिघांमध्ये 3 वाजून 20 मिनिटे ते 3 वाजून 30 मिनिटे असे 10 मिनिटे संभाषण झाले. त्यामुळे 10 मिनिटे काय संभाषण झालं याचा तापस करायचा आहे? असा महत्वाचा मु्द्दा एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर मांडला. त्यातसोबत संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचाही मोठा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.
advertisement
संतोष देशमुखांचं अपहरण 3.15 वाजता झालं होतं अशी माहिती एसआयटीने दिली होती. तर एफआयआरमध्ये संतोष देशमुख यांचा 3 वाजता अपहरण झाल्याचा उल्लेख आहे. यासोबत कराडने याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टात सादर करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हे संघटित गुन्हेगारीचा प्रकरण असल्याने कराडवर मकोका लावल्याचे एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले आहे. तसेच तपासात जे पुरावे मिळाले आहे त्याची कॉस वेरिफिकेशन करायची आहे म्हणून कोठडी मिळावी, अशी मागणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात केली आहे. या घटनेतील एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार असून त्याला मदत केली का? हे देखील तपासायचे आहे. विदेशी मालमत्तेची देखील चौकशी करायची आहे? अशा सगळ्या गोष्टीचा तपास करण्यासाठी कोठडी मिळावी यांसाठी एसआयटीच्या अधिकाऱ्याकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विष्णू चाटे व सुदर्शन घुले केज तालुक्यात खंडणी मांगत होते?
याचा तपास करायचा आहे. तसेच एसआयटी तपास अधिकाऱ्यांच्या नंतर आता सरकारी पक्षाच्या वकिलाचा युक्तिवाद सुरू झाले आहे. आणि सरकारी पक्षाच्या वकिलाकडून ही दहा दिवस पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
