TRENDING:

Suresh Dhas : वाल्मिक कराडने आवाज दिलेला 'तो' रोहित कोण? सुरेश धसांनी सगळंच सांगितलं

Last Updated:

कराड समर्थकांकडून परळी बंदच्या घोषणेवर बोलताना सुरेश धस म्हणाले की, परळी बंद ही नाविन्यपूर्ण योजना आहे.आपला माणूस जेलमध्ये गेल्यानंतर ज्याने इतका मोठा उद्योग केला आहे. हा माणूस जेलमध्ये गेल्यानंतर बीड, परळी बंद करणे कितपत योग्य आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Suresh Dhas on Walmik Karad Rohit : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयीत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आज वाल्मिक कराडला बीडच्या कोर्टात नेण्यात आले होते. यावेळी पोलीस व्हॅनमधून कोर्टात नेताना वाल्मिक कराड यांनी रोहित असा आवाज दिला होता.याआधी देखील कराडला तपासणीला नेताना त्याने रोहितला आवाज दिला होता. त्यामुळे वाल्मिक कराडचा हा जवळचा असलेला रोहित कोण आहे? अशी चर्चा सूरू झाली आहे.
walmik karad suresh dhas
walmik karad suresh dhas
advertisement

भाजप आमदार सुरेश धस आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना धस यांना रोहित बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर धस म्हणाले, रोहित हा त्याच्या हाताखालचा माणूस आहे. रोहित कांबळे करून. काय आता मदतीला वगैरे लागत असेल,असे धस यांनी सांगितले.

कराड समर्थकांकडून परळी बंदच्या घोषणेवर बोलताना सुरेश धस म्हणाले की, परळी बंद ही नाविन्यपूर्ण योजना आहे.आपला माणूस जेलमध्ये गेल्यानंतर ज्याने इतका मोठा उद्योग केला आहे. हा माणूस जेलमध्ये गेल्यानंतर बीड, परळी बंद करणे कितपत योग्य आहे. हा नवीन पायंडा आहे.इसके बाद जो भी जेल मे जाएगा, उसके लिए हम तुम्हारे साथ है. म्हणून आता शहर बंद करून टाकली. एखाद्यावेळेस मुंबईही बंद करून टाकतील, असा टोला धसांनी कराड समर्थकांना लगावला.

advertisement

कराड कुटुंबियांच्या आरोपावर बोलताना धस काय म्हणाले?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

भाजप आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलत होते. यावेळी देशमुख हत्या प्रकरणाच्या दोन दिवस आधी सुरेश धस वाल्मिक कराडला भेटल्याचा दावा कराड कुटुंबियांनी केल्याचा सवाल माध्यमांनी केला होता. यावेळी कुटुंबाचा हा दावा सुरेश धस यांनी फेटाळत मी वाल्मिक कराडला मी नाही भेटलो, अशी स्पष्टोक्ती दिली. वाल्मिकसोबत माझं काय वाईट होतं. मात्र वाल्मिकसोबत माझे चांगले संबंध होते. पण वाल्मिक कराड या प्रकारे माणस मारायला लागला तर मग त्याच समर्थन करायचं का? दोस्त आहे, मैत्री आहे, पण असं वागायला लागल्यावर त्याच्यासोबत राहायचं का? असा प्रतिसवाल सुरेश धस यांनी माध्यमांना केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Suresh Dhas : वाल्मिक कराडने आवाज दिलेला 'तो' रोहित कोण? सुरेश धसांनी सगळंच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल