मिळालेल्या माहितीनूसार, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर वाल्मिक कराड यांनी दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ज्योती जाधव यांच्या नावे सहाव्या मजल्यावर क्रमांक 610 सी ही 46.71 चौरस मीटर क्षेत्रफळाचं ऑफिस खरेदी केलं आहे. तसेच सहाव्या मजल्यावर 611 बी हे आणखी एक ऑफिसही ज्योती जाधव यांच्या नावे खरेदी केले आहे. या कोट्यावधी ऑफिस स्पेसची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत.
advertisement
दरम्यान वाल्मिक कराड आणि टोळीच्या वर्चस्वाला जसा दहशतीचा आधार आहे, तसाच या दहशतीतून निर्माण झालेल्या पैशातून या टोळीने राज्यभरात जे उद्योग आणि धंदे सुरू केलेत त्यातून मिळणाऱ्या पैशांचं पाठबळ आहे म्हणून दहशतीचं हे वर्चस्व मोडून काढायचं असेल तर या अशा आर्थिक स्रोतांवर देखील कारवाई व्हायला हवी. त्यातूनच ईडी अर्थात एन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
