वाल्मिक कराडच्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, त्याने खूप पाप केले आहेत, आता त्याला फेडावं लागणार आहे, तो आता सुटणार नाही. आता वाल्मिक कराडच्या पाठीराख्या मंत्र्याला देखील आत (तुरूंगात टाकलं) यायला पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
देशमुख कुटुंब तुमच्या घरी आलं आहे, त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये असं जरांगे यांनी म्हटले आहे. बीड प्रकरणातील आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका असून आरोपी देशमुख कुटुंब मारून टाकू शकतात अशी भीती देखील जरांगे यांनी व्यक्त केली आहे. न्याय देवता न्याय करेल, आरोपींना फासावर लटकवेल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केलाय.
advertisement
तसेच धनंजय मुंडे टोळ्या उठवून मला जातीयवादी म्हणतोय असा अशी टीका जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केलीय. बीड प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पडू असं म्हणत तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलाय.
कराडच्या सीसीटीव्हीवर जरांगे काय बोलले?
मनोज जरांगे पाटील सीसीटीव्हीवर बोलताना म्हणाले की, या मधल्या एकाही आरोपीला सोडू नका. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबियांवर संकट येऊ शकत. ते दहशत सु्द्धा पसरवून शकतात. देशमुख कुटुंबियांचा सुद्धा मर्डर करतील, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आताच तर सिद्धच झालं आहे या सीसीटीव्हीमुळे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी विशेष लक्ष देऊन या लोकाना सुटूच दिलं नाही पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली.
