देवळीत भाजपला मोठा धक्का
देवळी नगरपालिकेत अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी अत्यंत अटीतटीच्या लढतीत विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या निकालात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस या नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार होत्या, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. एका प्रभावशाली राजकीय घराण्यातील उमेदवाराचा पराभव झाल्याने या निकालाची वर्ध्यात मोठी चर्चा सुरू आहे.
advertisement
35 वर्षाच्या सत्तेला सुरंग
दरम्यान, गेल्या 35 वर्षापासून देवळी नगरपालिकेवर रामदास तडस यांची एकहाती सत्ता होती. अशातच रामदास तडस यांच्या अभेद्य किल्ल्याला सुरंग लागला आहे. रामदास तडस यांनी पत्नीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. या पराभवानंतर आता वर्ध्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 1:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Devali Election : 35 वर्षांचा गड उद्धवस्त! खासदाराच्या पत्नीला निवडणुकीत लोकांनी तोंडावर पाडलं
