मृतक अनिल मोखडकर (वय 40 वर्षे) हा दारू पिऊन नेहमी घरातील सदस्यांसोबत संपत्तीवरून वाद घालत असल्याचे समजते. अनेकदा बापलेकाचे याच कारणातून वादही झाले होते. शनिवारी
हा वाद अगदी टोकाला गेला.
घटना नेमकी कशी घडली?
आज सकाळपासूनच अनिल मोखडकर आणि त्याचे वडील गोपाल मोखडकर यांच्यामध्ये वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात त्याच्या वडिलांनी मुलगा अनिल मोखडकरच्या पोटात चाकूने गंभीर वार करून त्याची हत्या केली.
advertisement
घटनास्थळावरून कारंजा शहर पोलिसांनी आरोपी गोपाल मोखडकरला ताब्यात घेतले असून या प्रकरणाची पुढील चौकशी कारंजा शहर पोलीस करत आहेत.
पोलीस काय म्हणाले?
प्राथमिक माहितीनुसार, संपत्तीच्या वादातून बापाने मुलाचा खून केला आहे. दोघांमध्ये या ना त्या कारणावरून सतत भांडण होत होते. आज त्यांच्या भांडणाने टोक गाठले. बापाला राग अनावर झाल्याने त्याने मुलाच्या पोटात चाकू खुपसून त्याची हत्या केली. आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेले असून पुढील चौकशी सुरू आहे, असे कारंजा पोलिसांनी न्यूज १८ लोकमतला बोलताना सांगितले.
