पंढरपूर तालुक्यातील पळशी गावात राहणारे चंद्रकांत शेवाळे हे गेल्या दोन वर्षांपासून रेशीमची शेती करत आहेत. रेशीमची शेती करत असताना सुरुवातीच्या सहा ते आठ दिवस अळ्यांना पाला कमी लागतो. जसजसे रेशीमच्या अळीचे साईज वाढत असते तसतसे अळ्यांना तुतीचा पाला जास्त टाकावा लागतो. एका एकरात जवळपास 200 ते 300 अंड्यांची रेशीमची बॅच घेतली जाते.
advertisement
Success Story : शेतकऱ्यानं धाडसं दाखवलं, सव्वा एकरमध्ये केली घेवडा शेती, वर्षाला 3 लाख कमाई
उत्तम प्रकारच्या रेशीम अंडपुंजामधून तयार करण्याचे आणि त्यातून शंभर अंडकोष तयार झाले तर त्यातून 200 किलो कोश निघतो. सध्या रेशीम अंडकोशाला बाजारात 700 ते 800 रुपये किलो दराने भाव मिळत आहे. सरासरी सातशे रुपये किलो जरी भाव मिळाला तर सर्व खर्च वजा करून जवळपास एक लाख रुपयांचे उत्पन्न या रेशीम शेतीतून मिळते.
चंद्रकांत यांनी रेशीमच्या अळ्यांना लागणारा तुतीचा पाला बाहेरून न आणता चार एकरमध्ये तुतीची लागवड केली आहे. रेशीमच्या अळ्यांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण करावे लागते. रेशीमची शेती करत असताना रेशीमच्या अळ्यांना लागणारे तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ नये याची काळजी घेतली जाते. थंडी जर वाढली तर रेशीमच्या अळ्यांवर कागद टाकला जातो. त्यामुळे त्याच थंडीपासून अळ्यांचा बचाव होतो. तरुणांनी लाज सोडून शेती किंवा स्वतःच्या व्यवसायावर प्रामाणिकपणाने काम केले तर नक्कीच यश मिळेल, असा सल्ला उच्चशिक्षित चंद्रकांत शेवाळे यांनी दिला आहे.





