TRENDING:

Weather Alert: छत्रीनेही काम नाही होणार, 85 किमी सोसाट्याचा वारा अन् गारपिटीचा इशारा, 5 जिल्ह्यांत IMD कडून अलर्ट

Last Updated:

पाचगणी शहर आणि परिसरात जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे अंतिम टप्प्यात असलेल्या स्ट्रॉबेरीचं नुकसान झालं. तर गव्हालाही पावसाचा फटका बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे.
News18
News18
advertisement

विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात आलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. मागच्या 48 तासांत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत आणि विदर्भ मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पावसानं अतोनात नुकसान झालं आहे.

कुठे कुठे पावसाचा अलर्ट

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 20 आणि 21 मार्च हे दोन दिवस पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

advertisement

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या सरी बरसतील. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील भागांतही पावसाची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यात सायंकाळच्या सुमारास ढगाळ हवामान आणि पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.

शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा

हा पाऊस २० मार्चपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता असून, २१ मार्चपासून हवामान पुन्हा कोरडे होईल. मात्र, या काळात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. काही भागांत गारपिटीची शक्यता असल्याने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

का बदलतंय हवामान?

सध्या उत्तर भारतात जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या परिसरात एक शक्तिशाली वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. त्याचा प्रभाव थेट मध्य भारतापर्यंत जाणवत असून, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण तयार झाले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २० मार्चपासून देशभरातील १९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाला सुरुवात होईल. वारे ताशी ७० ते ८५ किलोमीटर वेगाने वाहू शकतात. उत्तर ते पूर्व आणि मध्य भारतापर्यंतच्या भागांवर परिणाम करेल. शेतकऱ्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

advertisement

महाराष्ट्रात कुठे किती नुकसान?

पाचगणी शहर आणि परिसरात जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे अंतिम टप्प्यात असलेल्या स्ट्रॉबेरीचं नुकसान झालं. तर गव्हालाही पावसाचा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वझर सरकटे गाव परिसरात गारपीट झाली. तर तळणी मंडळात मुसळधार पाऊस झाला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं नुकसान झालं. जालना शहरात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालं. जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. धुळे जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. गारपिटीचा सर्वाधिक फटका साक्री तालुक्यातील कासारे, पेरेजपूर परिसराला बसला. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Alert: छत्रीनेही काम नाही होणार, 85 किमी सोसाट्याचा वारा अन् गारपिटीचा इशारा, 5 जिल्ह्यांत IMD कडून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल