पुण्यात किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून ते येत्या आठवड्याभरात १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. मंगळवारी पुण्यात १६ अंश सेल्सिअयस किमान तापमानाची नोंद झाली. शहर आणि उपनगरांमध्ये गारठा वाढत आहे. सूर्यास्तानंतर तापमानात होणारी घट पहाटेपर्यंत कायम राहतेय. गेल्या आठवड्यात किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस इतकं होतं. ते १५.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालं. मात्र सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सिअसने हे तापमान कमी असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.
advertisement
मुंबईतही किमान तापमानाचा पारा २४ अंशावरून २० अंशावर घसरला आहे. मुंबईत थंडीचा कडाका जाणवण्यासाठी डिसेंबर किंवा जानेवारीचा पहिला आठवडा उजाडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्याचे किमान तापमान हे डिसेंबरच्या सरासरी पातळीवर आलेले नाही. राज्यात सध्याचं तापमान हे १५ ते १७ अंश सेल्सिअस इतकं आहे. हे सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअसने जास्त आहे. उत्तरेकडे बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर डिसेंबर अखेरीस किंवा त्यानंतर मुंबईत थंडी जाणवेल असं हवामान विभागाने म्हटलंय.