मुंबई : पहिल्यांदाच घर किंवा मालमत्ता भाड्याने देण्याचा निर्णय घेताना केवळ भाडे मिळेल, इतकाच विचार करून चालत नाही. योग्य माहिती नसल्यास छोट्या चुका पुढे जाऊन मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. भाडेकरारातील त्रुटी, चुकीची व्यक्ती भाडेकरू म्हणून निवडणे, कायदेशीर नियमांची माहिती नसणे यामुळे घरमालकांना आर्थिक नुकसान तर होतेच, पण न्यायालयीन प्रक्रियेतही अडकावे लागते. त्यामुळे घर भाड्याने देण्यापूर्वी काही अत्यंत महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. घर किंवा जमीन मालकांसाठी या 10 गोष्टी जाणून घेणे भविष्यातील त्रास टाळण्यासाठी उपयुक्त ठरते.
advertisement
कोणती काळजी घ्यावी?
घर भाड्याने देणे हा स्थिर उत्पन्नाचा चांगला मार्ग असू शकतो. मात्र, योग्य नियोजन आणि काळजी घेतली नाही, तर हा निर्णय डोकेदुखी ठरू शकतो. विशेषतः पहिल्यांदाच घर भाड्याने देणाऱ्या मालकांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे. कायदेशीर चौकट समजून घेतल्याशिवाय आणि योग्य कागदपत्रांशिवाय मालमत्ता भाड्याने देणे धोकादायक ठरू शकते.
पोलिस पडताळणी करा
सर्वात पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणजे भाडेकरूची पोलीस पडताळणी. भाडेकरू ठरल्यावर त्याची संपूर्ण माहिती जसे की, नाव, कायमचा पत्ता, ओळखपत्राचे पुरावे, मोबाईल क्रमांक. जवळच्या पोलीस ठाण्यात सादर करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून भविष्यातील गुन्हेगारी किंवा कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
नोंदणीकृत भाडेकरार करा
दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे सविस्तर आणि नोंदणीकृत भाडेकरार करणे. भाडेकरार हा घरमालक आणि भाडेकरू दोघांसाठीही कायदेशीर संरक्षण देणारा दस्तऐवज आहे. या करारात भाड्याचा कालावधी (उदा. 11 महिने किंवा त्यापेक्षा अधिक), मासिक भाडे, भाडे भरण्याची तारीख, सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम आणि परतफेडीच्या अटी स्पष्टपणे नमूद कराव्यात. तसेच वीज, पाणी, मेंटेनन्सचे बिल कोण भरेल, दुरुस्तीची जबाबदारी कोणाची असेल आणि भाडेवाढ कशी व केव्हा होईल, याचीही स्पष्ट नोंद असावी. नोंदणीकृत करारामुळे भविष्यातील वाद आणि कोर्टकचेरी टाळता येते.
सिक्युरिटी डिपॉझिट
तिसरे म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट योग्य प्रमाणात ठेवणे. जादा डिपॉझिट घेणे किंवा करारात नोंद न करता रक्कम स्वीकारणे भविष्यात अडचणीचे ठरू शकते. चौथे, भाडे नेहमी बँक ट्रान्सफर किंवा डिजिटल माध्यमातून स्वीकारणे योग्य ठरते, जेणेकरून व्यवहाराचा पुरावा उपलब्ध राहतो.
