प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील लोकनाट्य क्षेत्रातील तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांचा समावेश आहे. लोककला, लोकनाट्य जपण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान होत आहे. याशिवाय महाराष्ट्रातीलच अर्मिडा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. परभणीचे प्रयोगशील शेतकरी श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी कापूस पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केलेले आहे. त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. पालघरमधील वारlली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
advertisement
कोण आहेत रघुवीर खेडकर? (Who is Raghuveer Khedkar)
- मागील चार दशकांहून अधिक काळापासून रघुवीर खेडकर हे तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहेत.
- रघुवीर खेडकर हे तमाशा फडातील 'सोंगाड्या'ची भूमिका करणारे कलावंत आहेत. सोबतच ते तमाशा फडचालकही आहेत.
- रघुवीर खेडकर हे सध्या तमाशा फडमालक आणि कलाकारांच्या नव्याने स्थापन झालेल्या 'अखिल भारतीय तमाशा परिषद' या संघटनेचे अध्यक्ष आहेत.
- त्यांच्या तरूणपणात त्यांनी बोर्डावर केलेलं थाळीनृत्य अप्रतिम असं असायचं. त्यांचं हे नृत्य कथ्थक आणि लोककलेचे मिश्रण आहे.
उत्तम सोंगाड्या म्हणूनही त्यांचा लौकिक
आई कांताबाई सातारकर यांनी स्वबळावर सुरू केलेल्या तमाशा मंडळाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. उत्तम सोंगाड्या म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी दिल्ली येथे तमाशा सादर करण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. चंदिगड येथे संगीत नाटक अकादमी, मुंबई विद्यापीठ येथेही त्यांनी तमाशा सादर केला आहे. एक प्रयोगशील तमाशा फड मालक आणि कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.
हे ही वाचा :
