ही मुलं किंवा त्यांची अवस्था इतकी वाईट असते की त्यांना कोणी समोर उभं देखील करणार नाही, अशा मुलांसोबत मुली का रहातात? हा प्रश्न अनेक पालक, शिक्षक आणि सुजाण समाजमनाला पडला आहे .
या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र पोलीस दलातील महिला PSI मोसमी कटरे यांनी अत्यंत स्पष्टपणे दिलं आहे. त्यांचं हे बोलणं तुम्हालाही पटेल आणि तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर देखील मिळेल. शिवाय तुमची मुलं किंवा नातेवाईकांपैकी कोणी अशा वाटेला जात असेल तर नेमकं काय होतंय हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही त्यांना त्यामधून बाहेर काढू शकता.
advertisement
त्यांचं म्हणणं आहे की, आजच्या सोशल मीडियावर गुन्हेगारांना ‘स्टाईल आयकॉन’सारखं दाखवलं जातं. त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात, त्यांच्या वागणुकीला ‘कूल’ आणि ‘बोल्ड’ म्हणत गौरवलं जातं. हेच वातावरण तरुणांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकतं आणि मुलींनाही अशा मुलांमध्ये काहीतरी ‘धाडस’ आहे असं जाणवतं आणि त्यांच्याबद्दल ‘अॅट्रॅक्शन’ वाटू लागतं.
PSI कटरे म्हणतात, "मुली गुंड-टपोरी मुलांकडे अट्रॅक्ट होतात, कारण त्यांच्यातील जे 5-6 मुलं असतात ते त्या मुलीला बॉडीगार्ड सारखे असतात की ये आपने भाई की है भाभी है ये अपनी... अशी त्यांची भाषा असते आणि तिला ते खूप छान वाटायला लागतं. मग तिला असं वाटायला लागतं की मी क्विन आहे कुठलीतरी.. अगदी राणी आहे... आणि हे जे आहेत त्याचे मित्र ते माझे बॉडिगार्ड आहेत आणि ते पण तिच्यासोबत खूप चांगले वागतात की ही आपली वहिनी आहे."
पुढे PSI कटरे म्हणतात, "कुणी त्या मुलीकडे बघितलं तर ते मुलं त्याला मारतील की आपल्या वहिनीला का छेडलं. मग तिला ते असं वाटू लागतं की आपण कोणत्यातरी हिरोची हिरोईन आहे. पण तिला याचे दुष्परिणाम माहित नसतात. तिला हे कळत नाही सोसायटीमध्ये त्यांच्या काहीच किंमत नाही. अशा प्रकारे त्या या अशा मुलांकडे अट्रॅक्ट होतात आणि चुकीच्या मार्गाला लागतात."
मात्र ही मानसिकता अतिशय धोकादायक आहे, असं PSI कटरे यांचं स्पष्ट मत आहे. त्या म्हणतात, “गुन्हेगार हे हिरो नसतात, ते समाजासाठी धोकादायक घटक असतात. मित्र-मैत्रिणी निवडताना सावधगिरी बाळगणं अत्यावश्यक आहे. चुकीच्या लोकांच्या सहवासात गेल्यास आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.
त्या पुढे सांगतात की, नागपूर पोलीस सदैव नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहेत. फक्त पोलिसांवर विश्वास ठेवा आणि कुठल्याही संशयास्पद गोष्टीबद्दल मदतीसाठी पुढे या. आजच्या पिढीने ‘कूल’ आणि ‘स्टायलिश’च्या नावाखाली चुकीच्या लोकांना आयुष्यात जागा देणं थांबवणं गरजेचं आहे. कारण खरा हिरो तोच जो नियम पाळतो, आदर ठेवतो आणि समाजासाठी चांगलं काहीतरी करतो.
आता तरी तुमच्या प्रश्नाच उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल.