TRENDING:

इन्स्टावरची पायल, जंगलात भेटायला बोलवलं पण ती निघाली पत्नीच, महिलेनं BF च्या मदतीने पतीचा केला गेम

Last Updated:

Crime in Raigad : रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यात काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा खून त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरानेच केल्याचं उघड झालं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उरण: रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील पाबळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा खून त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरानेच केल्याचं उघड झालं आहे. या गुन्ह्यासाठी आरोपींनी सोशल मीडियाचा वापर करून संबंधित व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याला भेटायला बोलवून त्याची जंगलात नेऊन हत्या केली.
News18
News18
advertisement

कृष्णा खंडवी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो पेण तालुक्यातील गौळवाडी येथील रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी दीपाली आणि तिचा प्रियकर उमेश महाकाळसह अन्य आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हत्येची कबुली दिली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत कृष्णा खंडवी यांचा विवाह दीपाली हिच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच दीपालीचं उमेश महाकाळ नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले. हे प्रेमसंबंध सुमारे दोन वर्षांपासून सुरू होते. दोघांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं. पण कृष्णा हा दोघांच्या लग्नात अडसर ठरत होता. यामुळे आरोपींनी कृष्णाला कायमस्वरूपी दूर करण्याचा कट रचला.

advertisement

इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटवरून टाकला सापळा

आपल्या या क्रूर कटासाठी दीपाली आणि उमेश यांनी एक वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी सुप्रिया चौधरी नावाच्या मैत्रिणीच्या मदतीने इन्स्टाग्रामवर 'पायल' या नावाने एक बनावट अकाउंट तयार केले. या कथित 'पायल'च्या माध्यमातून आरोपींनी कृष्णा खंडवी याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.

नागोठणे येथे बोलावून अपहरण

प्रेमसंबंधाच्या नावाखाली 'पायल'ने कृष्णाला नागोठणे येथे भेटायला बोलावले. कृष्णा तिथे आल्यानंतर, दीपाली, उमेश आणि त्यांच्या साथीदारांनी त्याचे अपहरण केले. यानंतर त्याला वासगाव येथील निर्जन जंगलात नेऊन निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली.

advertisement

पुरावा नष्ट करण्याचा क्रूर प्रयत्न

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बलिप्रतिपदा म्हणजे काय? काय आहे साजरा करण्यामागची आख्यायिका? Video
सर्व पहा

या हत्येचा कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूर प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितले की, "हत्येनंतर कृष्णाची ओळख पटू नये, म्हणून त्याचा चेहरा आणि शरीरावर रसायन ओतलं होतं. पोलिसांनी या प्रकरणात पत्नी दीपाली आणि प्रियकर उमेश महाकाळसह अन्य आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इन्स्टावरची पायल, जंगलात भेटायला बोलवलं पण ती निघाली पत्नीच, महिलेनं BF च्या मदतीने पतीचा केला गेम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल