TRENDING:

प्रेम, संबंध अन् धोका! तरुणी संतापली अन् बॉयफ्रेंडला शिकवला चांगलाच धडा, पोलिसांचीही थेट कारवाई

Last Updated:

ज्या तरुणावर आपण प्रेम केलं, त्याने लग्नाचं आश्वासन दिलं, त्याने धोका दिल्यामुळे पीडित तरुणीने धाडस दाखवलं आणि वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे.  विकृत तरुणाने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले,  नंतर गर्भपातासाठी धमकावलं. अखेरीस तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.  आरोपी रेहान मोहम्मद शेख असं या आरोपी तरुणाचं नाव आहे.   रेहान शेख याने पीडित तरुणीशी प्रेमाचे नाटक करत तिचा विश्वास संपादन केला. विश्वासात घेतल्यानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, जेव्हा तरुणी गर्भवती असल्याचे समोर आले, तेव्हा आरोपीने आपला खरा चेहरा दाखवत लग्नास नकार दिला. मात्र, ती गर्भवती झाल्यानंतर गर्भपातासाठी दबाव टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

advertisement

पीडिता पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

ज्या तरुणावर आपण प्रेम केलं, त्याने लग्नाचं आश्वासन दिलं, त्याने धोका दिल्यामुळे पीडित तरुणीने धाडस दाखवलं आणि वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसासमोर पीडितेनं सगळी हकीकत सांगितली.  इतकंच नाही, तर गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे. पीडित तरुणीने धाडस दाखवत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  पोलिसांनी तत्काळ पीडितेच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रेम, संबंध अन् धोका! तरुणी संतापली अन् बॉयफ्रेंडला शिकवला चांगलाच धडा, पोलिसांचीही थेट कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल